आधार
आधार कालचीच गोष्ट. रविवारचा दिवस. सुट्टीमुळे थोडा निवांतपणा असला तरी लवकर जाग यावी असं बऱ्याच वेळा होतं. सकाळीच जगाच्या त्या टोकाला असणाऱ्या शाळकरी मित्र सुधीरनी WhatsApp ग्रुपवर एक व्हिडिओ पाठवला होता. त्या चार मिनिटाच्या काळ्या-पांढऱ्या व्हिडिओत आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं होतं. पहिल्या काही सेकंदातच कलावती रागाचे सूर ऐकू आले आणि जलद गतीतलं उडत्या चालीचं गाणं सुरु झालं. गाण्याचे शब्द होते " माझ्या रे प्रीती फुला ". या गाण्यात बऱ्याच गोष्टी वेगळ्या वाटल्या. गाणं ऐकल्याचं किंवा पाहिल्याचं आठवत नव्हतं, पण गाण्यात १९६९-७० सालच्या पुण्याची झलक बघायला मिळाली. स्वच्छ सारसबाग, त्यात चालू अवस्थेत असणारी कारंजी, झोपड्या नसलेली पर्वती, आणि रिकामे रस्ते पाहून त्या काळात गेल्याचा आनंद मिळाला. त्याकाळचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात केवढा तरी फरक पडलेला दिसला. गाण्यात त्याकाळच्या मानानी हिरो-हिरॉईनमधे जरा जास्त जवळीक (अमेरिकन भाषेत PDA) वाटली. गाण्यातले नट-नटी आकर्षक आणि अनोळखी होते. मग या गाण्याबद्दल, कलाकारांबद्दल आणि एकूणच सिनेमाबद्दल कुतूहल वाटलं आणि शोध सुर