पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली वृंदा

इमेज
‘वृंदा’ हे नाव घेतलं की एक हसरा आणि किंचित मिश्किल अशी झाक असलेला चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. पुण्याला ज्या अभिनव विद्यालयात शिकलो तिथे जवळजवळ पहिलीपासून एकाच वर्गात असलेले आम्ही सगळे मित्रमैत्रीणी. अशा या एकसंध वर्गात कोणी नवीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आले की अप्रूप वाटायचं. त्यामुळे आमच्या चौथीच्या वर्गात वृंदा पहिल्यांदा आली तेव्हा उत्सुकता असणार. कोण आहे, कुठून आली आहे, वगैरे.   लहानशी चण, गोल चेहरा आणि केळकर आडनावाला शोभेल असा गोरा रंग व घारे टपोरे डोळे. ती वर्गात पहिल्या एक-दोन रांगांमध्ये बाकावर बसायला लागली. तिच्या बाबांची बदली कोल्हापूरहून पुण्यात झाली होती बहुतेक. नवीन गाव, नवीन शाळा याचे तिला नक्कीच दडपण आलं असणार. पण लवकरच मनमिळावू स्वभावाने आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे ती वर्गात रुळली. इतकी की नंतर ती सगळ्यांची ‘आपली वृंदा’ झाली. योगायोग असा की वृंदाचे कुटुंब आमच्या गल्लीतल्या एका बंगल्यात राहायला आले होते. एकाच सोसायटीतल्या बिल्डिंगमध्ये माझा बाल सवंगडी भरत आणि मी राहत होतो. आणि आम्ही दोघे एका वर्गातही होतो. त्यामुळे आमची जोडगोळी होती. आता वृंदा पण आमच्याच वर्गात आल्यामुळ