पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘प्राईम मेन्स वेअर’चा जनक

इमेज
‘प्राईम मेन्स वेअर’चा जनक  १९ डिसेंबर २०१८. नेहेमीसारखाच एक बुधवार. सकाळी सहाच्या सुमारास उठून थोडं आवरून झाल्यावर सवयीने फोन उचलला आणि WhatsApp बघायला सुरुवात केली. जगभरात पसरले असले तरी सगळ्यांना जवळ आणणारा एक चमत्कार आणि समान दुवा म्हणजे WhatsApp. आपल्याला WhatsApp चं बहुतेक व्यसन लागलंय हे समजत असूनही त्याशिवाय राहवत नाही अशी माझी परिस्थिती. शाळेतल्या मित्रांच्या ग्रुपवर मकरंदचा दोन तासापूर्वी मेसेज होता, “आपला वर्गमित्र नितीन माने गेला.” फोनाफोनी सुरु झाली. बातमी खरी आहे का? थोड्याच वेळात खुद्द नितीनच्याच फोनवरून अजून एक निरोप आला, “माझे वडील नितीन माने यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार वैकुंठमध्ये अमुक-अमुक वाजता होणार आहेत - कुणाल माने”. म्हणजे नितीनच्या मुलानेच तो निरोप पाठवला होता. दुर्दैवाने अश्या बातम्या खऱ्या असतात तशी ही पण बातमी खरी निघाली होती. भारतात तेव्हा संध्याकाळचे सात-साडेसात वाजले होते. एकदम धक्काच बसला सगळ्यांना. डावीकडून तिसरा नितीन - पुणे, मे २०१८  चित्रपटात फ्लॅशबॅक दिसावा तसे मन मागे गेले. एकेक गोष्टी आणि प्रसंग आठवू लागले.