पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुरांची नजर, की समज?

इमेज
सुरांची नजर, की समज? कॉलेजमध्ये असतानाची गोष्टं, म्हणजे पंचवीस वर्ष उलटून गेली. खूप वाचायची आवड तेव्हाही होती. पु. ल. देशपांडे अतिशय आवडते लेखक. त्यांच्या सगळ्या पुस्तकांची पारायणं झालेली असली तरीसुद्धा त्यांनी लिहिलेलं किंवा त्यांच्याबद्दल काहीही लिहून आलेलं वाचायची ओढ असायची. तब्येत खालावत असूनही ते अधून-मधून लेखन करत होते. त्यांचे  ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या मागचे लेखसुद्धा हवेहवेसे वाटायचे. त्यावेळी त्यांच्याबद्दलच्या एका गोष्टीची आठवण अजूनही ताजी आहे. शास्त्रीय गायक म्हणून संजीव अभ्यंकर तेव्हा हळूहळू लोकांना परिचित होऊ लागला होता. १९८५-८६ चा काळ. संजीवचं गाणं तेव्हा आवडलं होतं. त्यातून संजीव माझ्या वयाचा आणि पुण्यात राहणारा म्हणून त्याच्याबद्दल जास्तच कौतुक वाटायचं. ‘रविवार सकाळ’ वृत्तपत्रात संजीवबद्दल तेव्हा एक छान लेख आला होता. संजीव हा एक दैवी चमत्कार (child prodigy) असून अगदी सात-आठ वर्षाच्या वयापासून उत्तम गाणं आणि मैफिली करत असे असं त्या लेखातून कळलं. त्यात लिहिलं होतं की संजीवचं गाणं तो अकरा-बारा वर्षांचा असताना पु. लं. नी प्रथम ऐकलं आणि त्यांना ते अतिशय आवडलं. पु. ल. म्हण